Saturday 27 April 2024

आहे का ही खरी?

 नात ‘इरा’ कडे पाहून सुचलेली कविता 


इतकी छान, गोरी पान, आहे का ही खरी?

नितळ अंग, गोरा रंग, नाजुकशी ही परी ?


झिप्र्या काळ्याभोर तिच्या, केसांच्याही लडी 

गालाभोवती, फेर धरुन, घालती, फुगडी.


इवले हात, इवले पाय, बोटे इवली, इवली.

तळवे सारे लाल गुलाबी, इवली लाल नखुली 


दोनच दात, लुकलुकतात, गालावर खळी 

मुशू मुशू, आले हशू, साखर उधळी 


काळे भोर, दोन टपोर, डोळे चंद्र-वाती 

पापण मोर, चंद्राची कोर, टकामका पहाती 


इवले हात, इवले पाय, पसंतच नाही 

लवकर मोठं होण्याची हो, हीला झाली घाई


हीला घेउन कुशीत आई, विमानाने जाई

तेवढ्यापुरते पंख हीचे, पायलट काका घेई 


ग्वालियरची राणी जणू, गाव पहिलं, वाई

तीन महिन्यांत, चार राज्ये, फिरून आली बाई 


1 comment:

  1. आजोबांची खुशी छान व्यक्त झाली आहे,वर्णनातून.स्टेटस मधे अशीच दिसली.

    ReplyDelete