Thursday, 22 February 2024

इराचे मोठ्ठे मोठ्ठे डोळे आणि हसू पाहून...

इराचे मोठ्या डोळ्यांचे, हसरे फोटो रोजच पाहत असतो. कधी कधी वाटतं की ही सगळी मंडळी आपल्यावर फिदा आहेत, हे इराला सुद्धा कळतंय.

त्यावर ही कविता.




एवढे मोठ्ठे डोळे करून, 

एवढं भलंs थोरलं हसून,

इतकं गोsड, गोsड दिसून, 

काळजात खोल, खोल घुसून,


करायचं काय असतं, बाई?

कुठ्ठे जायची इतकी घाई?

समजत तर काहीच नाही,

खाऊन, खेळून, झोपी जाई!


डोळ्यामध्ये जग सारे

हास्यामध्ये चांद तारे

सारा ऐवज, धन सारे

हिच्या ताब्यात, मन सारे


ही इवलिशी टिंबक टिल्लू 

अदा हिची आणि आम्ही उल्लू

दिसे निरागससे हे पिल्लू

पक्की खोडकर इरू पिल्लू 















No comments:

Post a Comment