त्याच्या घरी नव्हते पाणी
येता पोहून, नदीवरून,
यायचा करून, भांडी धुणी
आजोबाच्या लहानपणी
टीव्हीच नव्हता मुळी घरी
खेळत मित्राघरी कधी हा
कधी ते सगळे आमच्या घरी
आजोबाच्या लहानपणी
फोन घट्ट एके ठिकाणी
वायर नामे शेपूट त्याला
ऐकवायाचा निव्वळ वाणी
आजोबाच्या लहानपणी
कॉम्पुटरही नव्हता म्हणे
अवघड असणार,
भलतेच अवघड,
लहानपणीच असले जिणे
आजोबाच्या लहानपणी
विमान नव्हतं पाहिलं त्यानी
ओळखलं तरी कस्सं म्हणते;
पहिल्यांदा मग मोठेपणी?
आजोबाच्या लहानपणी
जिपीएस आणि गूगल नाही
इंटरनेटचा नव्हता पत्ता
पत्ता विचारत विचारत जाई
आजोबाच्या लहानपणी
नाही 4जी, नाही 5जी,
लहान तरीही असते झाले,
पण तेंव्हा म्हणे नव्हती आज्जी!!
No comments:
Post a Comment