विज्ञान
म्हणजे काय?
सतत चुका
सुधारत जाते ते विज्ञान
डॉ.
शंतनु अभ्यंकर, वाई.
लेखांक
२
नीट आणि
नीटस उत्तरे शोधायची युक्ति म्हणजे विज्ञान. त्या युक्तीबद्दल आपण शिकणार आहोत.
ह्या
युक्तीचा शोध अमुक एक माणसाला अमुक एके
दिवशी लागला असं नाही हं. अनेक लोकं, अनेक वर्षं, ही युक्ति वापरुन काय काय
विचार करत होते. आसपासचा शोध घेत होते. हळूहळू अशा पद्धतीने विचार केल्यास लवकर
उत्तर मिळतं हे कळलं. उत्तराचा पडताळा
पहाता येतो हे लक्षात आलं. अशा पद्धतीने
विचार केल्यास बिनचूक उत्तर मिळतं
हे कळलं. आणि यदाकदाचित उत्तर चुकलं तर ते
दुरुस्त करायची एक भन्नाट सोय या पद्धतीत होती.
आता हेच
बघा ना, अणूची रचना तुम्हाला आता शाळेत
शिकवतात. पण हा अणू कसा बनलेला आहे
याबद्दलचे शास्त्रज्ञांचे अंदाज, आडाखे आणि गणिते हळूहळू बदलत गेलेली दिसतात.
हळूहळू सुधारत गेलेली दिसतात. एकोणिसाव्या शतकाअखेरीस जे. जे. थॉमसन् या
ब्रिटीश शास्त्रज्ञानी सुचवलेलं अणूचं मॉडेल हे योग्य समजलं जात होतं. आता हे बाद
ठरलं आहे. थॉमसन् यांचाच विद्यार्थी, अर्नेस्ट रदरफर्ड यांनी, गुरुजींचं मॉडेल बाद
ठरवत, नवंच मॉडेल मांडलं. थॉमसन् यांच्या मॉडेलमधील बऱ्याच त्रुटी त्यांच्या या
शिष्योत्तमानी दूर केल्या. रदरफर्डनी अणुची रचना ही मधोमध केंद्र आणि त्याभोवती
फिरणारे इलेक्ट्रॉन, अशी कल्पिली. आपल्या सूर्यमालेसारखंच हे. प्रचंड मोठ्ठा सूर्य
आणि त्याच्या भोवती आपापल्या कक्षेत फिरणारे, सूर्याच्या मानानी कस्पटासमान, असे ग्रह.
पण ‘कक्षा’ म्हणजे चित्रात दाखवतात तशी काहीतरी गोल रेघ आहे आणि त्यानुसार हे
इलेक्ट्रॉन फिरत असतात असा तुमचा समज असेल, तर तो मात्र गैर आहे. इलेक्ट्रॉन
म्हणजे पृथ्वी, मंगळ वगैरे ग्रहांसारखी एखादी वजनदार वस्तू नाही. हे लक्षात घेऊन,
रदरफर्ड यांचा शिष्य, नील्स भोर यांनी गुरुवर्य रदरफर्ड यांच्या मॉडेलमध्ये आणखी सुधारणा केल्या. सध्याची
आपली अणुकल्पना ही अशी रदरफर्ड-भोर यांनी मांडलेली कल्पना आहे.
असे बदल
विज्ञानात नेहमीचेच. गॅलिलिओचा तो प्रसिद्ध प्रयोग तुम्हाला माहीत आहेच. उंचावरून
सोडलेली जड अथवा हलकी वस्तू एकाच वेळी जमिनीवर पडते हे त्यानी दाखवून दिलं. पुढे
न्यूटननी, वस्तूंच्या हालचाली आणि ग्रहांच्या हालचाली एकाच नियमानी चालतात, हे
दाखवून दिलं. आइनस्टाईननी, न्यूटनचे हे नियम काही परिस्थितीत लागू पडत नाहीत, असं
दाखवून दिलं. उदाहरणार्थ अणूच्या अंतरंगातील सूक्ष्म कण न्यूटनच्या गणितानुसार
चालत नाहीत.
पूर्वी
बरीच वर्ष माणसाला दोन बाजूला दोन मूत्रपिंड (Kidney) असतात आणि
त्यामुळे आपला तोल सांभाळला जातो असं समजलं जात होतं. मग तोल सांभाळण्याचा
मूत्रपिंडाशी काही संबंध नाही हे लक्षात आलं.
मूत्रपिंडं लघवी तयार करतात हे लक्षात आलं. आता तर ती ‘हीमोपॉएटिन’ हे रक्त
तयार करण्यास आवश्यक संप्रेरक तयार करतात हेही लक्षात आलं आहे.
विज्ञान
नावाची युक्ति अशी चुका सुधारत सुधारत पुढे जाते. यामुळे खूपच फायदा होतो. जंगलात
भटकताना समजा आपण वाट चुकलो तर ती चूक
सुधारण्याची संधी हवीच की. समजा आपली दिशा चुकली असेल, तर ती बदलायला हवी. समजा आपण नकाशा चुकीचा वाचला असेल, तर तो नीट
वाचायला हवा. समजा नेलेला नकाशाच चुकीचा असेल तर तो भिरकावून देत आपली आपण वाट
शोधायला हवी. विज्ञानाचा प्रवास असा चुका ओळखून, त्या दुरुस्त करत, सुधारत, सुधारत
होतो.
जगाची
रीती समजावून सांगणाऱ्या कथा, परिकथा,
पुराणकथा या पद्धतीत अशी सोय नाही.
प्रथम
प्रसिद्धी किशोर फेब्रुवारी २०२१
एकदम छान !
ReplyDeleteNice Blog ,your blog is sharing unique information....
ReplyDeleteWe provide Web Design, Web Development, Digital Marketing (SEO, SEM, SMO, SMM), and Mobile App Development services.
* Web Design Services | Web Design Solutions
* Web Design Packages | Web Development Packages
* Technical SEO Checklist | Website Audit Checklist
* Online HTML Editor | Wysiwyg HTML Editor
* Career opportunities | Online Jobs From Home
* Web Designing Course | Free Online Courses with Certificates
For more information visit our website at Digital Marketing Services | Online Marketing Services
Nice Post, CnX Player offers a fantastic Video Casting feature that gives an absolute freedom to all its users to cast ANY (literally ANY) video format and ANY video codec from PC to TV within a fraction of seconds! It is a Best Media Player.
ReplyDeleteFeatures @ CnX Player - Best Media Player
* Stream ANY video from PC to Chromecast
* Cast ALL Videos From PC To All Smart TV
* Stream ANY video from PC to Chromecast
* Cast Videos from iPhone iPad to Firestick TV
* Stream any videos from PC to MI TV
* Cast ALL Videos from PC to Android TV
* Stream ANY Video From PC To SAMSUNG TV
For more information visit our website at Best Media Player - CnX Player