नीओनेटल रिससीटेशनचा मंत्र
डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई. मो.नं. ९८२२०
१०३४९
ए.सी.,पंखे बंद करा, वॉर्मर करा चालू
नाकाआधी सक्शनट्यूब, तोंडामध्ये घालू
स्वच्छ झाला श्वसन मार्ग,
आता पहा नाडी,
तपासून जोडा नीट, बॅग मास्कची
जोडी
मानेखाली वळी, नीट ठेवा बघून
मार्ग होईल बंद, अती पुढे-मागे झुकून
मास्क धरा घट्ट, नीट नाक-तोंड
झाकून
छातीचा भाता, आता पहायचा
आहे वाकून
श्वास-दोन-तीन, श्वास-दोन-तीन, नीट धरा ताल
ऑक्सिजनचा सोडा वारा, होईल सारे छान
ठोका पडे, छाती हाले, झाले जंतर मंतर
बहिणाबाई सांगून गेली, आधीच
सारे हे तर
आला श्वास गेला श्वास, त्याच न्यारं हे तंतर
अरे जगणं मरणं, एका श्वासाचं अंतर
Do share if you feel it is useful.
ह्या आणि अशाच लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा.
shantanuabhyankar.blogspot.in