Monday, 8 January 2024

माझी नात 'इरा'साठी खास अंगाई गीत



नीज नीज गे सानुले 
नीज आईच्या कुशीत
नीज इरे गे चंचले 
वीज विसावे खुषीत

काय पाहतात डोळे?
बाळ मूठ चाचपडे 
काय शोधिते ग मन?
काय सोडवी ते कोडे?

जग सुखावले झोपी
तुला का चिंता विश्वाची?
तू ग इवलीशी किती
मोठी हो ग मोठेपणी

ससा आणि खारुताई
तुझी इवली बाहुली
सारे गाढ गेले झोपी
सामसूम सारी घरी 

उद्या दूर भूर जाऊ 
उद्या गोड खाऊ खाऊ
चिऊ काऊ भूभू माऊ
सारे खेळायला घेऊ

माझ्या सोन्या माझ्या बाळा
हाती पायी वाजे वाळा
काय चाललासे चाळा
गोजिऱ्या रे माझ्या बाळा

बोलले का तुला कोणी
आणिले का डोळा पाणी
नको रूसू माझे राणी
मीट पापणी पापणी

😴